nagpur corona

महाराष्ट्र राज्यासह राजधानी मुंबईदेखील कोराेनाच्या विळख्यात(corona patients in Mumbai) अडकली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या, वाढता मृत्यूचा आकडा यामुळे प्रत्येकाने कोराेनाचा धसका घेतला आहे. पण आता मुंबईकरांनी घाबरु नये व स्वत:ची काळजी घ्यावी. कारण मागील दहा दिवसांपासून कोराेना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या घटत असल्याची दिलासादायक बाब समाेर आली आहे.

नीता परब, मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून कोराेनाने जगभरात थैमान(corona in world) घातले आहे. महाराष्ट्र राज्यासह राजधानी मुंबईदेखील कोराेनाच्या विळख्यात(corona patients in Mumbai) अडकली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या, वाढता मृत्यूचा आकडा यामुळे प्रत्येकाने कोराेनाचा धसका घेतला आहे. कोराेनाचे हे सावट कायमच निघून जावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे, पण आता मुंबईकरांनी घाबरु नये व स्वत:ची काळजी घ्यावी. कारण मागील दहा दिवसांपासून कोराेना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या घटत असल्याची दिलासादायक बाब समाेर आली आहे.

मागील आठ महिन्यांपासून कराेनाने मुंबईकरांची झाेप उडवली आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबईत २८४५०९ बाधित रुग्ण सापडले, २५८९९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १०,९४५ रुग्णांचा कोराेनाना मृत्यू झाला आहे तर सध्या १३७५४ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. पण मागील काही दिवसांपासून कराेनाची वाढती रुग्णसंख्या घटत असल्याचे उघड झाले आहे. त्यात मागील दहा दिवसात कोराेनाची वाढती रुग्णसंख्या कमी झाले असल्याचे पालिका आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. ज्यामुळे भविष्यात कोराेनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वरिष्ठ डाॅक्टर नाकारत आहेत.

मागील दहा दिवसाची आकडेवारी पालिका आराेग्य विभागाने जारी केली असून यात २५ नाेव्हेंबरला १९ हजार ०१८ चाचण्या झाल्या यात १२७२ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले तर ६.६९ पाॅझिटिव्ह टक्केवारी समाेर आली आहे. याचबराेबर २६ नाेव्हेंबरला १७ हजार ९७३ चाचण्या झाल्या, यात ११६७ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले व ६.४९ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या हाेती. २७ नाेव्हेंबरला १६ हजार ९०२ चाचण्या झाल्या, यात ११३६ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले तर ६.७२ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून आली. २८ नाेव्हेंबरला १४ हजार ५९२ चाचण्या झाल्या, ९२२ पाॅझिटिव्ह रुग्ण व ६.३२ टक्के पाॅझिटिव्ह रुग्ण, २९ नाेव्हेंबर १० हजार ५३८ चाचण्या, ७२१ पाॅझिटिव्ह रुग्ण व ६.८४ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या, ३० नाेव्हेंबरला ११ हजार ७०६ चाचण्या झाल्या, ७५८ पाॅझिटिव्ह रुग्ण व ६.४८ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या, १ डिसेंबर १६ हजार १५० चाचण्या झाल्या, यात ७५८ पाॅिझटिव्ह रुग्ण, ६.४८ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या, २ डिसेंबर १५ हजार ३९९ चाचण्या, ८८० पाॅझिटिव्ह रुग्ण, ५.७१ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या, ३ डिसेंबर १५ हजार ८२३ पाॅझिटिव्ह रुग्ण, ५.२० पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या आणि ४ डिसेंबरला १६ हजार ३९४ चाचण्या, ८२५ पाॅझिटिव्ह रुग्ण व ५.०३ टक्के पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून आली आहे.