children infected with corona

लसीची अनुउपलब्धता असल्याने बऱ्याच नागरिकांनी लस न घेता पोटासाठी बाहेर पडत आहेत. ज्यामुळे पालकांमुळे घरातील बालकांना बाधित करण्याची शक्यता अधिक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पहिल्या लाटेच्या वेळी आयुष मंत्रालयाने सुचवलेला इम्युनिटी बूस्टरचा डोस बुरशीजन्य आजार आणि मान्सून काळात लहान मुलांमधील आजारांना प्रतिबंध करून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचे काम करेल.

    मुंबई: तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असा अंदाज व्यक्त करत असताना दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात मात्र लहान मुले कोरोनाने अधिक बाधित झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. ६ मे रोजी पर्यंत ० ते १० वर्ष वयोगटातील १ लाख ४७ हजार ४२० बालके कोरोना संसर्गाने बाधित होती. तर ५ जून रोजीच्या आकडेवारी नुसार त्याच वयोगटातील १ लाख ८० हजार ६१३ एवढी मुले बाधित झाली असल्याची नोंद करण्यात आली. या महिनाभराच्या कालावधीत ३३ हजार १९३ एवढ्या संख्येने बाल रुग्ण वाढले असल्याचे समोर आले. याला कारणीभूत लसीकरणाचा तुटवडा असून लसीकरण न घेतलेला आणि कामासाठी बाहेर पडणारा पालक वर्ग घरातील लहान मुलांना संसर्ग करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

    सार्वजनिक आरोग्य विभाग कडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी ० ते १० वर्ष वयोगटातील १ लाख ४७ हजार ४२० बालके कोरोना संसर्गाने बाधित होती. ही ३.०५ टक्केवारी आहे. तर ११ ते २० वयोगटातील ३ लाख ३३ हजार ९२६ मुले बाधित होती. ही टक्केवारी ६.९१ एवढी आहे. मात्र महिन्या भरानंतर म्हणजेच ५ जून रोजीच्या माहिती नुसार ० ते १० वयोगटातील १ लाख ८० हजार ६१३ एवढी मुले वाढली असल्याचे समोर आले. यावेळी टक्केवारी ३.१० एवढी होती. हि टक्केवारी .०५ ने वाढली आहे. तर ११ ते २० वयोगटातील ४ लाख १६ हजार ३४८ मुले कोरोनाने संसर्गित झाली . यावेळी ७.१५ एवढी टक्केवारी होती.

    लसीची अनुउपलब्धता असल्याने बऱ्याच नागरिकांनी लस न घेता पोटासाठी बाहेर पडत आहेत. ज्यामुळे पालकांमुळे घरातील बालकांना बाधित करण्याची शक्यता अधिक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पहिल्या लाटेच्या वेळी आयुष मंत्रालयाने सुचवलेला इम्युनिटी बूस्टरचा डोस बुरशीजन्य आजार आणि मान्सून काळात लहान मुलांमधील आजारांना प्रतिबंध करून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचे काम करेल. – डॉ. सुनील लांबे, सदस्य, आयुष राज्य टास्क फोर्स समिती