धक्कादायक – भायखळ्यातील सेंट जोसेफ अनाथाश्रमात कोरोनाचा शिरकाव, १५ लहान मुलांसह २२ जणांना झाली लागण

मुंबईच्या भायखळा(Bhaykhala) आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ आश्रमातील तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण(Corona Positive foud In St. Joseph Orphanage ) झाली असून त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे.

    मुंबई :तिसऱ्या लाटेची(Third Wave) भीती असताना मुंबईच्या भायखळा(Bhaykhala) आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण(Corona Positive foud In St. Joseph Orphanage ) झाली असून त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडास कोविड सेंटरमध्ये(Covid Center) उपचार सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून(BMC) देण्यात आली.

    मुंबईत आग्रीपाडा येथे सेंट जोसेफ अनाथ आश्रममध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरादरम्यान आश्रमामधील काम करणारे कर्मचारी आणि मुलांची अशा एकूण ९५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामधील २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १२ वर्षाखालील ४ मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. तर इतर १२ वर्षावरील ११ मुलांना तसेच ७ कर्मचाऱ्यांना भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रूडास कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.