मुंबईत कोरोनाने चिंता वाढवली; रुग्णवाढ अधिक तर रुग्णवाढीचा दरही वाढला

    राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे , औरंगाबाद , यवतमाळ, विदर्भ या ठिकाणी रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. विदर्भांनंतर आता मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सर्वाधिक असून कोविड रुग्णवाढीचा दर वाढून ०.२३ इतका झाला आहे. मंगळवारी ६४३ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ३,२०, ५३१ झाली आहे. काल ५०१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३ लाख ६८१ रूग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत पर्यंत एकूण ३१ हजार ६४,२११ कोविड चाचण्या करण्यात आल्या

    मुंबईत काल केवळ ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा ११ हजार ४४९ इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ९४ टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून ३०५ दिवसांवर आला आहे. मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी ३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेले सर्व रुग्ण पुरुष होते. तर तीनही मृतकांचे वय ६० वर्षा वर होते.

    मुंबईत ५१ इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८१५ इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात ७ हजार ५४८ अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र १ मध्ये ४०१ अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.