कोरोना निर्बंध ‘ब्रेक द चेन’ वस्तू आणि सेवा करसंकलनासाठी मात्र ठरलेत ‘ब्रेक द गेन’; एप्रिल महिन्यात अवघे ३६ टक्के करसंकलन!

मागील वर्षी देशात पहिल्यांदा कडक टाळेबंदी असूनही राज्यात  देशातील सर्वाधिक करसंकलन झाल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा मे महिन्यात अधिक करसंकलन झाले आहे. मागील वर्षी मे महिन्यात राज्यात ८४२६ कोटी इतकेच करसंकलन झाले होते.

  मुंबई: राज्यात कोविड-१९ च्या कडक निर्बंध ‘ब्रेक द चेन’ मध्ये कर संकलनात मात्र ‘ब्रेक द गेन’ ठरले आहेत. निर्बंधचा फटका जसा सर्वसामान्य व्यापारी, जनता आणि उद्योगांना बसला आहे तसाच तो वस्तू आणि सेवा करसंकलनाला देखील बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कराचे संकलन ३६ टक्क्यापर्यंत घसरले होते, नंतर मात्र मे महिन्यात थोडे सावरून ५९टक्क्यांवर स्थिरावले असल्याची आकडेवारी वित्त विभागातील सूत्रांनी दिली.

  विषाणूची चेन ब्रेक करण्यास प्राधान्य
  कोविड-१९ मध्ये विषाणूची चेन ब्रेक करण्याच्या प्राधान्य क्रमात पाच एप्रिल नंतर हळुहळू निर्बंध वाढवत नेण्यात आले, १४ एप्रिलनंतर ते कडक करण्यात आले. त्याचा परिणाम कर संकलनावर झाला आहे. निर्बंधामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवत असतानाच दुसरीकडे टाळेबंदी निर्बंधामुळे अर्थकारणाचा वेग देखील मंदावला. कारखान्यातील उत्पादन बंद झाले किंवा कमी झाले, बांधकामे विकास थांबला, तर असंख्य खाजगी आस्थापना दुकाने, इत्यादी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. केवळ अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात सुरू होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार देखील जवळपास बंद झाले.

  ८१३० कोटी रूपयांची करसंकलनात घट
  त्याचा परिणाम म्हणून एप्रिल २०२१ अखेर जो आर्थिक वर्षाचा पहिलाच महिना होता, १३,३९९ कोटी इतके वस्तू आणि सेवा कराचे संकलन करण्यात आले. त्या तुलनेत पुढचा मे महिना काहीसा दिलासा देणारा ठरला. या महिन्यात २२,०१२ कोटी रूपयांचे करसंकलन करण्यात आले. म्हणजेच मे महिन्याच्या तुलनेत एप्रिल २०२१ या महिन्यात ८१३० कोटी रूपयांची करसंकलनात घट पहायला मिळाली.

  व्यवहार ठप्प झाल्याचे प्रतिबिंब करसंकलनात
  याबाबत अधिक माहिती देताना वित्त विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, वस्तू आणि सेवा कायदा हा व्यवहार कसे आणि किती होतात त्यावर अवलंबून असणारा कर आहे. एप्रिल महिन्यात दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने आणि केवळ अत्यावश्यक सेवा आणि वस्तू खरेदी सुरू राहिल्याने त्याचे प्रतिबिंब करसंकलनात लगेच दिसून आले.

  मागील वर्षीच्या तुलनेत चांगले करसंकलन
  मागील वर्षी देशात पहिल्यांदा कडक टाळेबंदी असूनही राज्यात  देशातील सर्वाधिक करसंकलन झाल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा मे महिन्यात अधिक करसंकलन झाले आहे. मागील वर्षी मे महिन्यात राज्यात ८४२६ कोटी इतकेच करसंकलन झाले होते. यंदा मात्र २२,०१२ कोटी रूपये करसंकलन झाले आहे. देशात याच काळात एकूण करसंकलन ३५४१२.५ कोटी रूपये झाले आहे. सूत्रांनी सांगितले की, असे असले तरी