प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वांद्रे परिसरातील काही नामांकित रेस्टाॅरेंट आणि क्लबवर धाडी टाकण्यात आल्या.

    मुंबई (Mumbai).  कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वांद्रे परिसरातील काही नामांकित रेस्टाॅरेंट आणि क्लबवर धाडी टाकण्यात आल्या.

    वांद्रे पश्चिम परिसरातील आयरिश हाऊस पाली हिल, खार येथील यू टर्न स्पोटर्स बार आणि कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंट या तिन्ही रेस्टॉरंट व क्लबची पाहणी केली. यावेळी कोविड संदर्भात महापालिकेने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले जात असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. बांद्रा वेस्ट बारमध्येही १०० पेक्षा अधिक लोक विनामास्क असल्याचं आढळून आलं. महापालिकेनं आयरिश हाऊसकडून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० हजार, यू टर्न स्पोर्टस बारला २० हजार कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंटला ३० हजार, तर बांद्रा वेस्ट बारला ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

    दुबईहून आलेल्या चार जणांवर कारवाई
    परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई महापालिकेनं सात दिवसांसाठी क्वारंटाईन सक्तीचं केलं आहे. मात्र, दुबईतून आलेल्या चार प्रवाशांनी क्वारंटाईन नियमांचा भंग केला. सात क्वारंटाईन न राहता प्रवाशांनी मध्येच पोबारा केला. याप्रकरणी महापालिकेनं चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.