कोरोनाचा अहवाल मिळणार  केवळ २० मिनिटात !

आयआयटी हैद्राबादने विकसित केला संच मुंबई : कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अनेक समस्याना तोंड।द्यावे लागत आहे.कोरोना चाचणी अहवाल तातडीने उपलब्ध

आयआयटी हैद्राबादने विकसित केला संच 

मुंबई  : कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अनेक समस्याना तोंड।द्यावे लागत आहे.कोरोना चाचणी अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कोरोना चाचणी संच विकसित केला आहे. या संचाच्या मदतीने केवळ वीस मिनिटांत चाचणीचा अहवाल प्राप्त होत आहे. या संचाला मान्यता मिळण्यासाठी आयआयटी हैद्राबादने भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे अर्ज केला असल्याचे सांगण्यात आले.

हैदराबाद आयआयटीने विकसित केलेल्या संचाची किंमत केवळ ५५० रुपये आहे. जर या संचाचे अधिक उत्पादन केल्यास याचा उत्पादन खर्च ३५० पर्यंत होईल. या संचासाठी पेटंट घेण्यात येणार असून इएसआयआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या हैदराबादच्या संस्थेत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची चाचणी करता येणार आहे. हा संच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे घेऊन जाण्यास सोपा आहे.