बेस्टमधील १४९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, २७ जणांचा मृत्यू

  • बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. परंतु कोरोनामुळे आतापर्यंत २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे. मात्र बेस्टमधील कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या जास्त असल्याचा आरोप कामगार संघटना करत आहे.

मुंबई – मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. यामध्ये मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहतूकीस बंदी घालण्यात आली. तेव्हापासून मुंबईकरांसाठी दिवस रात्र बेस्ट सेवा देत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. परंतु कोरोनामुळे आतापर्यंत २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे. मात्र बेस्टमधील कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या जास्त असल्याचा आरोप कामगार संघटना करत आहे. 

आतापर्यंत बेस्टमधील १४९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ११५२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याच्या सुरुवातीपासुन बेस्ट अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना सेवा पुरवत होती आणि कमी फेऱ्यांत जास्त गर्दी झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनमध्ये कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झाली आहे. कामगार संघटनांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्याची मागणी केली होती.