आता बोंबला! लोकांनी घरातच थांबावे यासाठी सरकारने असा केला आहे रामबाण उपाय; जिथे जाल तिथे होणार चाचणी ; माॅलमध्ये केल्या जाणाऱ्या काेराेना चाचणीला २५० रुपये माेजावे लागणार

रेल्वे, एसटी डेपाे या ठिकाणी चाचणी माेफत केली जाणार आहे. तर माॅलमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी शुल्क घेतले जाणार आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की, माॅलमध्ये येणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲन्टीजन काेराेना चाचणी केली जाणार असून या चाचणीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

    मुंबई: मुंबईत काेराेना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता, पालिका प्रशासनाने चाचणीसंख्या ही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत साेमवारपासून माॅल, रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपाे येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी केली जाणार आहे.