iqbalsingh chahal

काेराेनाला(corona in Mumbai) राेखण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल(Iqbalsingh chahal) यांनी मुंबईकरांना केले आहे.

    मुंबई : काेराेनाला राेखण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल(Iqbalsingh chahal) यांनी मुंबईकरांना केले आहे. त्यासाठी पालिकेच्या आराेग्य खात्याची यंत्रणा विभागवार सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    गेल्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईत दरराेज २४ हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर गेल्या एप्रिल महिण्यात दरराेज सुमारे ४४ हजार चाचण्या करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सुमारे ५० हजारापर्यंत गेलेल्या चाचण्यांची संख्या आता २८ हजारांवर आली आहे.

    काेराेनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि काेराेनाला राेखण्यासाठी आपण सुरू केलेल्या लसीकरणाच्या माेहिमेची गती मंदावली आहे. चाचण्यांसाठी पुन्हा वेग द्यायला हवा त्यासाठी नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त चहल यांनी केले आहे. दरराेज किमान ४० हजार नागरिकांच्या काेराेनाच्या चाचण्या करण्याचे लक्ष असून काेराेचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी अथिकाधिक नागरिकांनी चाचण्या करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    सुट्टयांमुळे चाचण्यांमध्ये घट
    गेल्या रविवारी २८ हजार ६३६ चाचण्या करण्यात आल्या. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने चाचण्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. आत्तापर्यंत ५४ लाख ९० हजार २४१  काेराेना चाचण्या झाल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य खात्याने दिली आहे.