८० टक्के मुंबईकरांना… कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोक्याबाबतचा टाटा इन्स्टिट्युटचा महत्वपूर्ण निष्कर्ष

शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला. अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.

  मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश चिंतेत असतानाच आता शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका नसणार असल्याचे संशोधन टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरने (टीआयआरएफ) केले आहे.

  या संदर्भातला रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार तब्बल ८० टक्के मुंबईकर हे कोरोनाच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तुलनेने कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचे सांगितले आहे. या ८० टक्क्यांमध्ये ९० टक्के जनता ही स्लममध्ये राहणारी आहे. तर ७० टक्के जनता ही सोसायटीमध्ये राहणारी असल्याचे सांगितले आहे.

  शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला. अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.

  टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या या रिपोर्टनुसार भारतात कोरोनाची एन्ट्री होऊन १७ महिने लोटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांना कोरोनाची लागण होऊन जे रुग्ण बरे झाले आहेत. त्या बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये एन्टीबॉडीज् या कमी झाल्या असतील. त्यामुळे अशा रुग्णांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका होण्याची शक्यता असल्याचे टीआयआरएफच्या टेक्नोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स स्कूलचे डीन डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. तसेच ज्या २० टक्के मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली नाही, अशा २० टक्के नागरिकांनाच्या लसीकरणावर भर दिली पाहिजे, असे देखील संदीप जुनैजा म्हणाले.

  टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या या रिपोर्टनुसार, ८० टक्क्यांपैकी तब्बल १० दहा टक्के नागरिकांना जरी कोरोनाची लागण झाली तर ते रुग्ण पूर्वीच्या ज्या पद्धतीने बरे झाले त्याच मार्गाने ते रुग्ण बरे होणार आहेत. या तिसऱ्या लाटेवर परिणाम करणारे तीन घटक आहेत एक म्हणजे जो नवा व्हेरिएंट आहे डेल्टा प्लस नावाचा त्यावर लस किती प्रभावी आहे आणि त्याच बरोबर राज्यात ६० टक्के निर्बंध शिथिल केले आहेत त्यानंतर होणार गर्दी. लोक कोरोना नियमांचे पालन करतात का, हा देखील महत्त्वाचा घटक असणार आहे.

  लसीचे दोन डोस घेणे फायदेशीर

  कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. काहीजण पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाचे दोन डोस घेण्याचे फायदे आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा परिणाम होतो. पण दुसऱ्या डोसचा त्याहीपेक्षा जास्त फायदा होतो. मुंबई महापालिकेने एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईतील २.९ लाख कोविड रुग्णांचे सर्वेक्षण केले. दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली, तर पहिला डोस घेतलेल्या १०,५०० जण कोविडची बाधा झाली.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती बिकट झाली होती. आता रुग्णसंख्या नियंत्रणात आहेत, मात्र तरीही धोका टळलेला नाही. अजूनही लोकं कोविड नियमांचे पालन योग्य पद्धतीने करत नाहीत. डेल्टा प्लास व्हेरिएंटचा धोका वाढत आहे, असे असूनही नियम पाळण्याकडे कानाडोळा होत आहे. जर नियमांचे पालन केल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल.

  - डॉ. संजय ओक, प्रमुख, कोविड टास्क फोर्स