घरी राहा-सुरक्षित राहा, राज्यात ६६,१९१ नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ५४९८ रूग्ण

राज्यात आज ८३२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

    मुंबई : रविवारी राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. शनिवारच्या तुलनेत रविवारी १ हजाराने संख्या कमी झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,९५,०२७ झाली आहे. आज ६१,४५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३५,३०,०६० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१९ एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,९८,३५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ८३२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२८ मृत्यू, पुणे-५३, औरंगाबाद-४३, नाशिक-२७, नांदेड-२३, सोलापूर-१८, अहमदनगर-१६, ठाणे-१५, नागपूर-१२, चंद्रपूर-६, रायगड-४, सिंधुदुर्ग-३, जळगाव-२, गडचिरोली-१, जालना-१, परभणी-१, रत्नागिरी-१, सांगली-१ आणि भंडारा-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५७,४९,५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,९५,०२७ (१६.६८) टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,३६,८२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५४९८ रुग्णांची नोंद

    दरम्यान मुंबईत दिवसभरात ५४९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६२७६४४ एवढी झाली आहे. तर आज ६४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत १२,७९० मृत्यूची नोंद करण्यात आली.