मुंबईकरांनो, लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करु नका, पुढचे ३ दिवस मुंबईत लसीकरण राहणार बंद

मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण(corona vaccination stopped for next 3 days) होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई: कोरोना प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccine) घेण्यासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा (Covid 19 vaccine shortage) असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण(corona vaccination stopped for next 3 days) होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) म्हणाले की, पुढचे तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. तीन दिवस लसीचा साठा मिळणार नाही त्यामुळे आम्हाला लसीकरण करता येणार नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला लस उपलब्ध व्हावी. लस मिळाली तर आम्ही शॉर्ट नोटीसवर लोकांना कळवू आणि लसीकरण सुरू करणार आहोत.

    ते पुढे म्हणाले, महापालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार आहोत. खाजगी  कार्यालये, मोठ्या हौसिंग सोसायटी इथे आम्ही नवीन टप्प्याचे लसीकरण सुरू करणार आहोत. आपण टेस्टिंग वाढवले होते त्यावेळी बाजार, ट्रेन सगळं सुरू होती. आता या सगळ्या गोष्टी लॉकडाऊनमुळे कमी झाल्या आहेत. आपण पॉझिटिव्ह लोकांचे सर्व जवळचे लोक टेस्टिंग करत आहोत.

    आमची टीम प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी जाऊन पाहणी करते. त्यामुळे कोणाला कोणता बेड हवा आहे हे ठरवले जाते, असेही ते म्हणाले.