काेराेना लसीकरणाला रविवारी सुट्टी !; इतर लसीकरण मोहिम व कामकाजात काेणतीही अडचण येवू नये याची घेतली जातेय दक्षता

कोविन ॲपमध्ये आलेली तांत्रिक समस्या साेडविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून येत्या काही दिवसात केंद्र सरकार ही समस्या साेडविणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्यामुळे येत्या मंगळवारपासून पुन्हा लसीकरणाचे काम सुरु हाेणार आहे. दुसरा डाेस घेण्यास विलंब झाल्यास काहीही हरकत नाही !

मुंबई: पाेलिओ यासहित इतर लसीकरण माेहिमेमध्ये काेणतीही अडचण येवू नये यासाठी केंद्र सरकारने आठवड्यातील केवळ चार दिवस काेराेना लसीकरण करण्याबाबतचे दिशा निर्देश देण्यात आले आहेत. परंतु पालिका आराेग्य विभागाने आठवड्यातील सहा दिवस काेराेना लसीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रावर साेमवार ते शनिवारपर्यंत लसीकरण कार्यक्रम हाेणार आहे तर रविवारी मात्र लसीकरण कार्यक्रम बंद राहणार असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईत आठवड्यातील दाेन दिवस मंगळवार व शनिवारी पाेलिओ लसीकरण माेहिमेचे काम सुरु असते. मुंबई लसीकरणाचे काम सांभाळत असलेल्या पािलकेच्या उपकार्यकारी आराेग्य अधिकारी डाॅ. शीला जगताप यांनी सांगितले की, मुंबईत पाेलिओ लसीकरणाचे काम आराेग्य केंद्रांच्या माध्यमातून केले जाते. काेराेना लसीकरणासाठी पालिकेची प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये केंद्र बनविण्यात आली आहेत. ज्यामुळे काेराेना लसीकरण माेहिमेमुळे इतर लसीकरण मोहिम व कामकाजावर काेणतीही अडचण येवू नये याची दक्षता घेतली जात आहे. ज्यामुळे मुंबईत आठवड्यातील सहा दिवस काेराेना लसीकरण मोहिम सुरु ठेवण्याबाबत पालिका आराेग्य विभागाची तयारी असल्याचे डाॅ. शीला जगताप म्हणाल्या.

पालिकेच्या भाभा रुग्णालयात ऑब्जरवेशन रुम वाढविणार !

वॅक्सिनच्या पहिल्या दिवशी पालिकेच्या वांद्रे भाभा रुग्णालयात जागेचा अभाव दिसून आला. याबाबत संबधित रुग्णालय प्रशासनाकडून ही समस्या लवकरात लवकर साेडविण्यात येईल, असे पालिका उपकार्यकारी आराेग्य अधिकारी डाॅ.शीला जगताप यांनी सांगितले. सदर रुग्णालयात ऑब्जरवेशन रुमची कमतरता असून येत्या काही दिवसात येथे ऑब्जरवेशन रुमची संख्या वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले.

काेविन ॲपची समस्या केंद्र सरकार लवकर दूर करणार !

लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच काेविन ॲपची समस्या सुरु झाली असल्याचे निदर्शनास आले. लसीकरण वेळेत म्हणेच १६ जानेवारीला सुरु केले जाणार असल्याने पािलका आराेग्य विभागाने काेविन ॲपवर अपलाेड करण्यात आलेल्या लाभार्थींच्या नावाची यादी काही दिवसांपूर्वीच तयार केली हाेती. ज्यामुळे प्रत्येक लाभार्थींना वाॅर्ड वाॅर रुमच्या माध्यमातून फाेन व मेसेज पाठविण्यात आले. कोविन ॲपमध्ये आलेली तांत्रिक समस्या साेडविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून येत्या काही दिवसात केंद्र सरकार ही समस्या साेडविणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्यामुळे येत्या मंगळवारपासून पुन्हा लसीकरणाचे काम सुरु हाेणार आहे.
दुसरा डाेस घेण्यास विलंब झाल्यास काहीही हरकत नाही !

वॅक्सिनचा पहिला डाेस घेतल्यानंतर लाभार्थींना दुसरा डाेस २८ दिवसानंतर दिला जाणार आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये लसीकरण चाचणीचे समन्वय डाॅ. दिनेश धाेडी यांनी सांगितले की, दुसरा डाेस घेण्याकरीता लाभार्थींना जर एक अथवा दाेन दिवस विलंब झाला तरीही त्यामुळे आराेग्याच्या काेणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. यािशवाय जे.जे. रुग्णालयात काेवॅक्सीन डाेसला विराेध हाेत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत, पण यावर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रणजीत मानकेश्वर यांनी अफवा असल्याचे सांगितले आहे. शनिवारी केंद्रावर ३९ लाभार्थींनी वैक्सीन घेतले असल्याचे सांगण्यात आले. या लाभार्थ्यांवर काेणताही दुष्पपरिणाम झाला नाही.