कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीचा दीड तासातच झाला मृत्यू; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

लस घेतल्यानंतर ते लगेच चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात(ICU) भरती करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीला कार्डियोमायोपॅथी (ह्रदयाचे ठोके कमी होणे), हायपरटेंशन आणि डायबिटीजसारखे गंभीर आजार होते अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य पथकाने दिली.

    मुंबई : कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीचा दीड तासातच मृत्यू झाल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. या व्यक्तीला अनेक आजार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

    मृत व्यक्तीचे वय ६५ वर्षे आहे. ते मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणारे होते. जोगेश्वरीमधील मिल्लत नर्सिंग होममध्ये त्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. मृत व्यक्तीला दुपारी ३.३७ वाजता सीरम इंस्टिट्यूटच्या कोवीशील्ड व्हॅक्सीनचा ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.

    लस घेतल्यानंतर ते लगेच चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात(ICU) भरती करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीला कार्डियोमायोपॅथी (ह्रदयाचे ठोके कमी होणे), हायपरटेंशन आणि डायबिटीजसारखे गंभीर आजार होते अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य पथकाने दिली.

    भिवंडी परिसरात एका ४० वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला होता. लस घेतलेल्या अनेक लोकांमध्ये याचे साइड इफेक्ट पाहण्यात आले आहेत. यामुळे लशीच्या परिणामांबाबत संशय निर्माण झाला आहे.