corona vaccine

मुंबईतील पालिकेच्या केईएम, नायर, सायन व राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयात कोरोना वॅक्सीन चाचणी(corona vaccine test) सुरु आहे. यात ऑक्सफार्ड-एस्ट्राजेनेक द्वारा विकसित ‘काेविशील्ड’ व भारत बाेयाेटेक द्वारा ‘काे-वॅक्सीन’ या दाेन कंपनीच्या वॅक्सीनची चाचणी सुरु आहे. आतापर्यंत या वॅक्सीनची चाचणी ३५१ स्वयंसेवकांवर करण्यात आली असून अजूनही काेणत्याही स्वयंसेवकावर या वॅक्सीनचा दुष्परिणाम झाला नसल्याची दिलासादायक बाब आहे.

नीता परब, मुंबई : संपूर्ण जग कोराेना वॅक्सीनची(corona vaccine) वाट पाहत आहे. कोराेना वॅक्सीनची चाचणी सध्या महत्वाच्या शहरांमधील रुग्णालयात सुरु आहे. यात मुंबईतील(corona vaccine testing in mumbai) पालिकेच्या केईएम, नायर, सायन व राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयात वॅक्सीन चाचणी सुरु आहे. यात ऑक्सफार्ड-एस्ट्राजेनेक द्वारा विकसित ‘काेविशील्ड’ व भारत बाेयाेटेक द्वारा ‘काे-वॅक्सीन’ या दाेन कंपनीच्या वॅक्सीनची चाचणी सुरु आहे. आतापर्यंत या वॅक्सीनची चाचणी ३५१ स्वयंसेवकांवर करण्यात आली असून अजूनही काेणत्याही स्वयंसेवकावर या वॅक्सीनचा दुष्परिणाम झाला नसल्याची दिलासादायक बाब आहे.

या रुग्णालयात सुरु आहे वॅक्सीनची चाचणी
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता व पािलका प्रमुख रुग्णालयाचे संचालक डाॅ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात ‘काेविशिल्ड’ वॅक्सीनची चाचणी सुरु आहे. यात २४८ स्वयंसेवकांवर वॅक्सीनची चाचणी करण्यात आली आहे. यात काही जणांना वॅक्सीन तर काही जणांना प्लेसिबा देण्यात आले आहे. तर जे.जे. रुग्णालयात ‘काे-वॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. यात १०३ स्वयंसेवकांवर चाचणी सुरु आहे. तर सायन रुग्णालयात ‘काे-वॅक्सीन’ चाचणी येत्या दाेन ते तीन दिवसात सुरु हाेणार आहे. या चाचणीसाठी ३०० स्वयंसेवकांनी नाेंदणी केली आहे.

प्लेसिबा म्हणजे काय ?
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.रणजीत माणकेश्वर यांनी सांगितले की, ‘काेणत्याही व्यक्तीवर औषधांचा किती व कशाप्रकारे मानसिक परिणाम हाेताे, हे शाेधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिकित्सा पध्दतीला प्लेसिबा म्हणतात. या पध्दतीने शरीरावर काेणताही दुष्परिणाम हाेत नाही. ही अशी चिकित्सा पद्धत आहे की, ज्यात औषधांचा उपयाेग केला जात नाही तर भ्रम व वास्तविकता या आधारावर काम करण्यात येते. म्हणजेच रुग्णांना औषध दिले जाते. मात्र ते औषध नसते.

चाचणीसाठी काेणाची हाेते निवड ?
या चाचणीसाठी शरीरातील राेगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. शिवाय हदय, मधुमेह आदी आजारांनी ग्रासित नसावे. याशिवाय स्वयंसेवकांचे वय १८ वर्षापेक्षा कमी असू नये, महिलांच्या निवडीबाबत, ही महिला ही गराेदर नसावी तर ती गर्भनिराेधक गाेळ्यांचे सेवन नियमित करत नसावी.