लसीकरणाबाबत BMC ने दिलीये महत्त्वाची माहिती; क्लिक करा आणि राहा अपडेट

सर्वांनाच लस घेण्याची घाई झाली आहे. पहिला नंबर माझाच्या नादात काही ठिकाणी लसींचाही तुटवडा असल्याने सगळ्याची जुळवाजुळव करताना यंत्रणांचीही दमछाक होते आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज महापालिकेने माहिती प्रसिद्ध केली आहे.

  मुंबई : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर अनेक लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने अपॉईंटमेट कन्फर्म असल्याशिवाय लसीकरणासाठी येऊ नका असे आवाहन सर्वच यंत्रणांतर्फे वारंवार करण्यात येत असूनही लोकं त्याचं उल्लंघनच जास्त करताना दिसत आहेत.

  सर्वांनाच लस घेण्याची घाई झाली आहे. पहिला नंबर माझाच्या नादात काही ठिकाणी लसींचाही तुटवडा असल्याने सगळ्याची जुळवाजुळव करताना यंत्रणांचीही दमछाक होते आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज महापालिकेने माहिती प्रसिद्ध केली आहे.

  याबाबत @mybmc या अधिकृत ट्विटर हँडलवर महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली असून या सूचनांचे तंतोतत पालन करावे असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

  • सकाळी ७.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.४५ वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत.
  • पाच केंद्रे ही सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या ठिकाणीही सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ५०० डोस उपलब्ध होणार आहेत.
  • ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस घ्यायचा असल्यास यासाठी नावनोंदणी करण्याची गरज नाही पण यासाठी पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि एसएमएस आलेला असणं गरजेचं आहे.
  • लसीकरण केंद्रांच्या यादीबाबतची माहिती आज रात्री अपडेट करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने या ट्विटमध्ये नमूद केले आहे.