केंद्रीय अर्थसंकल्पातील ३५ हजार कोटींचा वापर मोफत लसीकरणासाठी करा : प्रमुख विरोधीपक्षांची एकमुखी मागणी

देशभरातील विरोधी पक्षनेत्यांनी याबाबत एकत्रित पत्रक काढले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे हे पाहता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह करणारे पत्रक जारी केले आहे.

    मुंबई : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचा वापर मोहिमेसाठी करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.  त्यातून तातडीने देशातील लोकांचे मोफत लसीकरण करावे. अशी मागणी करत देशभरातील विरोधी पक्षनेत्यांनी याबाबत एकत्रित पत्रक काढले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे हे पाहता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह करणारे पत्रक जारी केले आहे.

    ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा

    यामध्ये राज्यातील काँग्रेस,  राष्ट्रवादी, शिवसेनेसह इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्रित पत्रक जारी केले आहे. त्यात केंद्राने देशातील सगळ्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ” आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो की देशातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. सोबतच सरकारने तातडीने देशातील लोकांचे मोफत लसीकरण करावे. याशिवाय अर्थसंकल्पात लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचा वापर मोहिमेसाठी करावा.”