मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली कोरोनाची लस

कोविड प्रतिबंधक लस घेताना यावेळी बीकेसी जंबो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते. तसेच कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लस महत्वाची असून पात्र नागरिकांनी लस घ्यावी, तसेच त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त चहल यांनी यावेळी केलं आहे.

    मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज (मंगळवार) वांद्रे-कुर्ला संकुल जंबो कोविड केंद्र येथे कोरोनाची लस घेतली आहे. कोविड प्रतिबंधक लस घेताना यावेळी बीकेसी जंबो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते. तसेच कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लस महत्वाची असून पात्र नागरिकांनी लस घ्यावी, तसेच त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त चहल यांनी यावेळी केलं आहे.

    दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक नेत्यांनी लॉकडाऊनला जाहीर विरोध केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील लॉकडाऊनवरुन संताप व्यक्त केला आहे.

    लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही. पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.