corona vaccine

मुंबईत काेराेनाचे रुग्ण(corona patients) आढळून आल्यानंतर तब्बल ३०० दिवसानंतर येत्या १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात हाेणार आहे. पहिल्या दिवशी मुंबईतील ९ केंद्रामध्ये तब्बल १२, ५०० आराेग्य कर्मचाऱ्यांना लस(corona vaccination) देण्याचे मुंबई पालिका आराेग्य विभागाचे लक्ष्य आहे.

नीता परब, मुंबई: मुंबईत काेराेनाचे रुग्ण(corona patients) आढळून आल्यानंतर तब्बल ३०० दिवसानंतर येत्या १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात हाेणार आहे. पहिल्या दिवशी मुंबईतील ९ केंद्रामध्ये तब्बल १२, ५०० आराेग्य कर्मचाऱ्यांना लस(corona vaccination) देण्याचे मुंबई पालिका आराेग्य विभागाचे लक्ष्य आहे. परिवहन,लसीचे स्टोरेज व लसीकरण केंद्र याकडे वारंवारं लक्ष ठेवण्यात येत आहे, ज्यामुळे लसीकरणामध्ये काेणतेही अडथळे निर्माण हाेणार नसल्याची याेग्य ती काळजी घेतली जात असल्याचे अतिरिक्त मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

९ केंद्रांवर ७२ बु‌थ
नऊ वॅक्सीन केंद्राची निवड करण्यात आली असून या केंद्रात एकूण लसीकरणासाठी ७२ बुथ तयार केले जाणार आहे. प्रत्येक बुथमध्ये वॅक्सीनेटर सह पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या केंद्रावर येत्या १६ जानेवारी सकाळी विशेष गाडीतून वॅक्सीनची बुथवर आणण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रात डाेसच्यानुसार, वॅक्सीन स्टाेरेजची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कुठे असणार किती बुथ
पालिकेच्या प्रमुख रुग्णालय सायन, नायर, केईएम व कूपर, कांदिवली येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकाेपर राजावाडी, सांताक्रुझ येथील व्हि.एन.देसाई, वांद्रे येथील भाभा रुग्णालय व बीकेसी जम्बाे काेविड सेंटर येथे लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून यात भाभा रुग्णालयात ४ बुथ, राजावाडी रुग्णालयात ५ बुथ, व्ही.एन.देसाई रुग्णालयात २बुथ, कांदिवली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ६ बुथ, बीकेसी येथे १५ बुथ, सायन, नायर केईएम व कूपर रुग्णालयात प्रत्येकी १० बुथ तयार करण्यात आले आहेत.

डाेससाठी केवळ १० मिनिटे?
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कराेना लसीकरणासाठी प्रत्येक बुथवर पाच सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे. यात सुरक्षारक्षक, वअक्सीनेटर, वेरीफायर, मोबिलाइजर व आर्ब्जवर अशाप्रकारे टीम असणार आहे. वॅक्सीनसाठी तीन खाेल्या असणार आहेत. वॅक्सीनसाठी प्रवेश घेण्यापूर्वी सुरक्षारक्षका कडून थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल त्यानंतर लिस्टमध्ये नाव व मेजेस व आयडी याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर माेबिलाइजर लसीकरणाची माहिती दिली जाणार, त्यानंतर काेविन साॅफ्टवेअरचा डाटामध्ये माहिती घेत सदर माहिती याेग्य आहे का? याची पाहणी केली जाणार आहे. वैरीफिकेशन ते लस घेण्याच्या या कालावधीला ७ ते १० मिनिटे लागणार आहेत. डाेस दिल्यानंतर सदर व्यक्तीला डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सदर व्यक्ती ३० मिनिटे देखरेखीखाली राहणार आहे. यात एएफआय कीट यासहित इतरही औषधाेपचार असणार आहेत. यािशवाय प्रत्येक केंद्रात १० खाटा असणार आहेत यात २ खाटा या आयसीयू सहीत असणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र माेदी कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबराेबर संवाद साधणार
१६ जानेवारी लसीकरणाची सुरुवात हाेणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान माेदी पालिकेच्या कूपर रुग्णालयातील लाभार्थी व आराेग्य कर्मचारी डाॅक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांबराेबर संवाद साधणार आहेत. काे-विन ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी अथवा इतर समस्यांबाबतही पंतप्रधान माेदी कर्मचाऱ्यांबराेबर चर्चा करणार आहेत. यात पालिका प्रशासनाने टू-वे व्हिडिओ काॅन्फरन्सची सुविधा उपलब्ध करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.