बेस्टच्या तिसऱ्या कामगाराचा कोरोनाने घेतला बळी

मुंबई :बेस्ट उपक्रमाच्या रविवार पर्यंत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.मात्र सोमवारी आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बेस्टमधील कोरोनाचे आतापर्यंत तीन बळी गेले आहेत. बॅकबे

मुंबई :  बेस्ट उपक्रमाच्या रविवार पर्यंत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.मात्र सोमवारी आणखी  एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बेस्टमधील कोरोनाचे आतापर्यंत तीन बळी गेले आहेत.

बॅकबे आगारामध्ये मुकादम म्हणून काम करणाऱ्या  एका कर्मचाऱ्याचा केईएम रुग्णालयात कोरोनाच्या आजारावर उपचार सुरू होता त्याचा मृत्यू झाला आहे.या कर्मचाऱ्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता.२२ एप्रिल २०२० पासून तो  कामावर येऊ शकला नाही . या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे  १ मे रोजी निदर्शनास आले अखेर त्याचे निधन झाले. या पूर्वीही बेस्टच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनानाने मृत्यू झाला.तर सोमवारी आणखी एका बेस्ट कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने  बेस्ट मध्ये कोरोना मृतांची संख्या तीन झाली आहे. आतापर्यंत बेस्ट मधील एकूण ३६ कोरोनाबाधित आहेत.अशी माहिती उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमाचा चौथा कोरोना बाधित बरा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परळ येथील कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या या  बेस्ट उपक्रमाच्या दादर कार्यशाळेमधील कर्मचाऱ्याला २७ एप्रिल पासून कोरोनाची लागण झाल्यामुळे क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी कोरोनावर मात केली असून  त्यांना डिस्चार्ज देण्यात आला  आहे.कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यात बेस्ट उपक्रमाच्या या चौथ्या योद्ध्याला यश मिळाले आहे.दरम्यान,

केईएम् रुग्णालयात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला बेस्ट उपक्रमाने स्वतःच्या निधीतून १ कोटीचे अर्थ सहाय्य त्यांच्या कुटुंबाला देण्यात यावे.अशी मागणी करणारे पत्र दि बीईएसटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे यांना दिले आहे.बेस्ट कामगारांना सेवा सुविधा देण्याचे प्रशासनाने कबुल केले आहे. मात्र आर्थिक मदती विषयी काही निर्णय झाला नसल्याने या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींना मदत मिळते की नाही याबाबत अनिश्चितता आहे.त्यातच सोमवारी तिसऱ्या बेस्ट कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बेस्ट कामगारात भीतीचे वातावरण आहे.