प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना संक्रमित व्यक्तीचे एयरोसोल 10 मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात. तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत जातात, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतात ते देखील संसर्ग पसरवू शकतात.

    दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. अशातच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांच्या कार्यालयाने कोरोनाच्या संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

    कोरोना संक्रमित व्यक्तीचे एयरोसोल 10 मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात. तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत जातात, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतात ते देखील संसर्ग पसरवू शकतात.

    कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर, ज्या ठिकाणांवर व्हेंटिलेशनची चांगली सुविधा असते, तेथे एखाद्या संक्रमितामुळे दुसऱ्याला संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. दरवाजे-खिडकी बंद ठेवून एसी सुरू ठेवल्याने खोलीमध्ये संक्रमित हवा जमा होते आणि दुसऱ्या लोकांना संक्रमणाचा धोका वाढतो, अशी सूचनाही वैद्यकीय सल्लागारांनी केली आहे.