Ban on keeping new elephants in zoos Anarkali is the only elephant in the Jijamata Zoo in Mumbai

मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राणीबाग बंद करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 15 फेब्रुवारीला म्हणजे 11 महिन्यानंतर पुन्हा सुरू झाले. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे महिन्याभरातच राणीबाग पुन्हा बंद करण्यात आले आहे.

    मुंबई : नव्या कोरोना निर्बंधांमुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय (राणीबाग) 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, उद्यानातील नूतनीकरणाचे काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

    मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राणीबाग बंद करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 15 फेब्रुवारीला म्हणजे 11 महिन्यानंतर पुन्हा सुरू झाले. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे महिन्याभरातच राणीबाग पुन्हा बंद करण्यात आले आहे.

    उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एक महिना बंद असले तरी नूतनीकरणाची कामे सुरूच राहणार आहेत. कर्मचारीही नियमितपणे कामावर येत राहणार आहेत. त्यामुळे कोणतेही काम थांबणार नाही. नूतनीकरणादरम्यान, विविध पक्ष्यांच्या पिंजऱ्यांचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आणखी जोमाने पर्यटकांसाठी नेहमीप्रमाणेच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणार आहे, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.