कोरोना बदलतोय रुप, समोर आली कोरोनाची ६ नवी लक्षणे

  • या अभ्यासानुसार ज्या व्यक्तींना गंभीर लक्षण असतील त्यांना ओळखण्यात मदत होईल. तसेच डॉक्टरांना देखील उपचारात समजण्यात मदत होणार असल्याचे समजले आहे. अभ्यासात आसे आढळून आले की कोरोना बाधित जास्त लोकांना ऑक्सिजन सपोर्टची गरज भासते. असे दिसून आले.

मुंबई – कोरोना विषाणुने जगभर थैमान घातला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी आपला जीव गमवला आहे. तर करोडो लोकांना कोरोनाची बाधा झाले. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे कोरोनावर १०० पेक्षा जास्त देश लस शोधत आहेत. परंतु कोरोना कालांतराने वेळो वेळी आपले रुप बदलत आहे. त्यामुळे आता कोरोनाची ६ नवीन लक्षण समोर आली आहेत. मेडआरएक्सआयव्ही प्रीप्रिंट प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केलेल्या अहवालात ब्रिटन आणि अमेरिकेतील सुमारे १६०० लोकांचा डेटाचा आधारे अभ्यास करण्यात आला. सर्व लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. त्याना असलेल्या लक्षणांच्या आधारे हा सखोल अभ्यास करण्यात आला. 

या अभ्यासानुसार ज्या व्यक्तींना गंभीर लक्षण असतील त्यांना ओळखण्यात मदत होईल. तसेच डॉक्टरांना देखील उपचारात समजण्यात मदत होणार असल्याचे समजले आहे. अभ्यासात आसे आढळून आले की कोरोना बाधित जास्त लोकांना ऑक्सिजन सपोर्टची गरज भासते. असे दिसून आले. 

हि आहेत कोरोनाची ६ नवी लक्षणे

तापाशिवाय फ्लू सारखी लक्षणे आढळतात

तापासह फ्लू सारखी लक्षणं 

पोट आणि आतडयांसंबंधी ( गॅस्ट्रोइन्टेटायनल) 

थकवा जाणवणे 

श्वसनाचा त्रास होणे

पोट तसेच श्वसन प्रणालीमध्ये वेदना होणे

तसेच थकवा जाणवणे आणि श्वसनाचा त्रासामधील रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची जास्त गरज असते. तसेच श्वसन प्रणालीमध्ये वेदना होणाऱ्या रुग्णाला देखील ऑक्सिजनची आवश्यकता आसते. चौथ्या आणि पाचव्या प्रकारची लक्षणे वयोवृद्धांमध्ये अधिक दिसून आले आहे. ६ लक्षणांपैकी कोणतीही लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.