आजपासून कोरोनाची कॉलर ट्यून होणार बंद; त्या ऐवजी सुरु होणार ही नवी कॉलर ट्यून

देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे.

मुंबई.  महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना प्रतिबंधाची माहिती देणारी कॉलर ट्यून आजपासून बंद करण्यात आली आहे. या कॉलर ट्यून ऐवजी कोरोना लसीकरणाची धून ऐकू येणार आहे (corona new collar tune). देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. मात्र, ही कॉलर ट्यून आजपासून बंद करण्यात आली आहे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

आजपासून कोरोना कॉलर ट्यून हटवून त्या ऐवजी लसीकरणाची नवी ट्यून लावण्यात येणार आहे.  स्वास्थ मंत्रालय आणि सूचना प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दरम्यान, सोमवारी या संदर्भातील बैठक पार पडली होती.