dry fruits

जीवनावश्यक वस्तूंबरोबर भाजीपाला, कडधान्य, गोडे तेल याचे जसे भाव वाढले आहेत, तसेच ड्रायफ्रूट्सचे सुद्धा भाव(Dry Fruits Prize Hike) वाढले आहेत. आज देशभरात या ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता, यांसारख्या उत्पादनांवर तीन पट्टीने किमतीत वाढ झालेली आहे.

    मुंबई: जगात कोरोनाने(Corona) हाहाकार घातल्यामुळे सर्रास देशातील अर्थव्यवस्था मंदावली आहे. तसेच कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. कित्येकांचे रोजगार गेले आहे. अनेकांनी कसे जगायचे म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना आपण पहिल्या आहेत. कोरोनामुळे अर्थचक्र थांबल्याने स्वाभाविकपणे याचा परिणाम महागाईवर झाला आहे. आज जगातील अनेक देशात महागाईचा(Inflation) दर वाढला आहे. त्यातच पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol – Diesel Prize Hike) गगनाला भिडले असल्यामुळे त्याचा परिणाम दळणवळणावर दिसत आहे. माल वाहतूक करणारी वाहने याना ने-आण करणे परवडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


    जीवनावश्यक वस्तूंबरोबर भाजीपाला, कडधान्य, गोडे तेल याचे जसे भाव वाढले आहेत, तसेच ड्रायफ्रूट्सचे सुद्धा भाव(Dry Fruits Prize Hike) वाढले आहेत. आज देशभरात या ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता, यांसारख्या उत्पादनांवर तीन पटीने किमतीत वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस दरवाढ होत असल्याने दुकानदार हे त्रस्त आहेत.

    दुकानदारांचे म्हणणे आहे की, देशामध्ये सध्या कोरोनामुळे ड्रायफ्रूट्स उत्पादन कमी होत आहे.तसेच त्याची आयात निर्यातही कमी होत आहे. सध्या भारतामध्ये वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव यामुळेही ड्रायफ्रूट्सची आयात निर्यातीच्या खर्चावर परिणाम झाला आहे. तसेच टॅक्स लावला जातो. त्यामुळे ही ड्रायफ्रुट्ची किंमत आता वाढत चाललेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा ड्रायफ्रूट्स खरेदी करण्यास कमी प्रतिसाद मिळत आहे. लोक जीवनावश्यक गरज भागवून नंतर ड्रायफ्रूट्स खरेदीला प्राधान्य देत असल्याने ड्रायफ्रूट्स खरेदीसाठी ग्राहकांचा कल कमी दिसत आहे