कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती; लोकल बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मागील वर्षी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लोकल बंद करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही लोकल सेवा सुरु करण्यात आली. सर्व सामान्यांना लोकल प्रवासासाठी अनेक महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली. आता पून्हा एकदा कोरोनाचा कहर वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र, लोकल बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

    मुंबई : मुंबईत कोरोनाची अत्यंत गंभीर स्थितीत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मुंबईत अनेक निर्बंध लावण्यात आलेत. अशातच आता लोकल बाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

    मुंबई लोकलवर पुन्हा निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ५० हजाराच्या पार जात आहे. तर, मुंबईत दिवसाची रुग्णवाढ दहा हजारांपेक्षा जास्त आहे.

    मागील वर्षी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लोकल बंद करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही लोकल सेवा सुरु करण्यात आली. सर्व सामान्यांना लोकल प्रवासासाठी अनेक महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली. आता पून्हा एकदा कोरोनाचा कहर वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र, लोकल बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

    सध्या लोकल मधील वाढती गर्दी पाहता कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यामुळे लोकल लोकलवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसा विचार राज्य सरकार करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. या निर्बंधानंतर सर्व सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवेश पुन्हा एकदा बंद होवू शकतो अशी चर्चा आहे.