रविवारी राज्यात 16,620 नवीन रुग्णांची नोंद; सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता आरोग्य विभागाचे विविध प्रयत्न सुरू आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याबाबत विचार करीत आहे.

    मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत चालला आहे. रविवारी 16,620 नवीन रुग्णांची राज्यात नोंद झाली. मागील आठवडाभरापासून रुग्णसंख्या वाढत चालल्यामुळे आरोग्य विभागासमोर पुन्हा आव्हान उभ ठाकले आहे.

    रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता आरोग्य विभागाचे विविध प्रयत्न सुरू आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याबाबत विचार करीत आहे.

    देशात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23,14,413 वर पोहोचली. रविवारी 8,861 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

    रविवारी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,26,231 वर पोहोचली. याचबरोबर, रविवारी 50 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.