covid hospital

मुंबईतील सर्वात मोठे कोविड रुग्णालय असलेल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलची नव्या रुग्णांना सामावून घेण्याची क्षमताच संपली आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनारुग्णवाढीने अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्याचा विचारही प्रशासन करीत आहे. दरम्यान, अनेक भागात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. दररोज रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीने प्रशासनात खळबळ उडाली आहे. शासनाने जिल्ह्यात निर्बंध लावण्याचे सर्वाधिकार महापालिका आणि स्थानिक प्रशासनाला दिल्याने जिल्हापातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनारुग्णवाढीने अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्याचा विचारही प्रशासन करीत आहे. दरम्यान, अनेक भागात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  मुंबईत नाइट कर्फ्यू?

  मुंबईत विक्रमी संख्येने करोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तर, एकीकडे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. आता मुंबईत नाइट कर्फ्यू लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे विधान किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत असून बाजारांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे व नियम पाळले पाहिजेत, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

  कोविड हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत

  मुंबईतील सर्वात मोठे कोविड रुग्णालय असलेल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलची नव्या रुग्णांना सामावून घेण्याची क्षमताच संपली आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.

  नांदेडमध्ये 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध

  नांदेड जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या निर्णयामुळे संबंधित आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी या आस्थापनांना पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्यानेही 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  उस्मानाबादेत व्यापाऱ्यांना चाचणी बंधनकारक

  उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये सराफा लाईनमध्ये एकाच दिवसात 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 10 जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कळंबमध्ये एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सराफा लाईनमधील व्यापारी आणि कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली.