मुंबईत कोरोनाचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर ; मागील २४ तासांत २ हजार ५५४ नव्या कोरोना रूग्णांची नोंद

राज्यात दिवसभरात तीन लाख नमुने तपासल्यावर 51880 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात एवढय़ाच चाचण्या केल्यानंतर सरासरी 65 हजार रुग्णांची नोंद झाली होती. या तुलनेत गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या कमी आहे.

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने खाली येताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 2554 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे.

    एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला साधारण 10 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती उद्भवली होती. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागल्याचे प्रकारही घडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 2500 येऊन स्थिरावला आहे. हे मुंबईतील परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक आहे.