कोरोनाची लाट ओसरली! मार्चमध्ये महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी

डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या आणि मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. एकूण 15 महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत एकूण अडीच कोटी मतदार असतील. मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका 10 बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला आणि नागपूर महापालिका आहे.

  मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता स्थानिक निवडणुका घेण्याबाबत अखेर तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या कालखंडामुळे राज्यातील महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पण, आता या निवडणुका मार्च महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली असल्याची माहिती समोर आली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही निवडणूक मिनी विधानसभेसारखी असणार आहे. या निवडणुकीत तब्बल अंदाजे 7 कोटी मतदार आपले स्थानिक प्रतिनिधी निवडणार आहे.

  15 महानगरपालिकांचा समावेश

  डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या आणि मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. एकूण 15 महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत एकूण अडीच कोटी मतदार असतील. मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका 10 बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला आणि नागपूर महापालिका आहे.

  210 नगरपालिकांची फेब्रुवारीत संपणार मुदत

  310 नगरपालिका आणि नगर पंचायत यात 1 कोटी 26 लाख मतदार असतील. यात 100 नगरपालिकांची मुदत संपली आहे, 210 नगरपालिकांची मुदत फेब्रुवारी संपणार आहे. सुमारे 3 कोटी 50 लाख मतदार असलेल्या 27 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहे. 27 जिल्हा परिषद आणि 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूक त्याच बरोबर 299 पंचायत समितीच्या निवडणूक होतील. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेची मुदत संपली आहे. त्याचबरोबर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम नागपूर या जिल्हा परिषदमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पोटनिवडणूक होणार आहे. तर ठाणे, पालघर वगळून सर्व जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. राज्यातील 200 ग्रामपंचायतच्या निवडणूक याच कालावधीत होईल. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आता कामाला लागण्यास हरकत नाही.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]