मुंबईच्या पालकमंत्र्याना कोरोनाची लागण

  • राज्यातील काही लोकप्रतीनीधी आणि नेत्यांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रकोप झालाय. राज्यातील काही लोकप्रतीनिधींही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत तर काहींनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील काही लोकप्रतीनीधी आणि नेत्यांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना लागण झाल्याची बातमी त्यांनी स्वतः आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी टि्विट करत म्हटले आहे की, हे मला कळवण्यासाठी दुःख होत आहे की कोविड-१९ साठी मी सकारात्मक चाचणी केली आहे. मी सध्या स्वत: ला अलग ठेवत आहे. माझ्याशी जवळीक साधून आलेल्या सर्वांना त्यांची चाचणी घेण्याची विनंती करतो. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरापासून काम करत राहणार आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.