
नागपूर ते शिर्डी आणि मुंबई मार्गावरील ईगतपुरीपर्यंत जवळपास 34 हजार मजूर समृद्धीच्या कामात व्यस्त होते. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून कामकाजात बाधा निर्माण झाली आहे. होळीपूर्वीच मजुरांनी स्थलांतर सुरू केले असून भीषण उन्हाळ्यात कच्च्या वस्तूंच्या पुरवठ्यावरही विपरित परिणाम झाला आहे. नागपूर, नाशिक, जालना आणि औरंगाबादमध्ये उष्णता वाढली असून कोरोनामुळेही कामकाज प्रभावित झाले आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते राज्याची उपराजधानी नागपूरपर्यंत तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सावली पडली आहे. 701 कि.मी. लांब असलेल्या या एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर- शिर्डीपर्यंत 520 कि.मी. चा मार्ग या वर्षी मे महिन्यापर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते परंतु कोरोनामुळे कामावर विपरित परिणाम झाला आहे.
नागपूरत ते शिर्डीपर्यंत समडृद्धी महामार्गाचे काम जवळपास 80 ते 85 टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येते. मे महिन्यापर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दिशेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. ततापि, अचानक कामकाजावर परिणाम झाला आहे. समृद्धी महामार्गावर कार्यरत विदर्भ व मराठवाड्यातील मजुरांचे स्थलांतरही सुरू झाले आहे.
नागपूर ते शिर्डी आणि मुंबई मार्गावरील ईगतपुरीपर्यंत जवळपास 34 हजार मजूर समृद्धीच्या कामात व्यस्त होते. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून कामकाजात बाधा निर्माण झाली आहे. होळीपूर्वीच मजुरांनी स्थलांतर सुरू केले असून भीषण उन्हाळ्यात कच्च्या वस्तूंच्या पुरवठ्यावरही विपरित परिणाम झाला आहे. नागपूर, नाशिक, जालना आणि औरंगाबादमध्ये उष्णता वाढली असून कोरोनामुळेही कामकाज प्रभावित झाले आहे.
समृद्धी महामार्गाची निर्मिती 16 टप्प्यात केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कामकाज बाधित झाले आहे. ते पाहू जाता पुन्हा एकदा वेळापत्रक तयार करावे लागेल व तारीखही पुढे ढकलावी लागेल. तसेही सुरक्षा सुविधा, पेट्रोल पंप व इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन, सीसीटीव्ही, टोल बूथ आदी सुविधा निर्मितीत विलंब होत असल्याचे एमएसआरडीसी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले.
नागपूर ते मुंबई दरम्यानचा हा महामार्ग तीन टप्प्यात सुरू करण्याचे लक्ष्य होते. 701 कि.मी. चा तिसरा आणि अंतिम टप्पा 1 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे व वाहतूक सुरू करण्याचे लक्ष्य होते परंतु सद्यस्थिती पाहू जाता आता विलंब होणार आहे.
याशिवाय पहिला टप्पा आता मे ऐवजी तीन- चार महिन्यानंतरच सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी व इगतपुरीदरम्यान 103 कि.मी. डिसेंबर 2021 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे.
उर्वरित 78 कि.मी. इगतपुरी आणि वडपेदरम्यान 1 मे 2022 रोजीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सद्यस्थिती पाहू जाता महामार्ग निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यावर विचारविनिमय सुरू आहे. गेल्यावर्षीही लॉकडाऊनमुळे समृद्धीच्या कामात अडसर निर्माण झाला होता.
55335 कोटी रुपये खर्चुन तयार होणारा हा देशातील सर्वात मोठा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे आहे. प्रकल्पासाठी जवळपास 22000 एकर जमिन अधिग्रहित करण्यात आली आहे. हिरवळीसाठी मुंबई-नागपूर महामार्गावर 12 लाख 87 हजारपेक्षा अधिक वृक्षारोपणाचीही योजना आहे. महामार्गामुळे वन्यजीवांना त्रास होऊ नये यासाठी जवळपासच्या जंगल परिसरात अंडरपास आणि ओव्हरपास मार्ग निर्मितीचे काम सुरू आहे.