street dog

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या श्वान विभागामार्फत श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण (sterilize them) आणि रेबीज लसीकरण (vaccinate them against rabies) करुन पुन्हा त्या श्वानांना मुळे परिसरात सोडण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईतील (Mumbai) गल्यांमध्ये, रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे (stray dogs) मुंबईकर हैराण झाले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर फिरताना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. भटक्या कुत्र्यांच्या बाबत अनेक तक्रारी मुंबई महानगरपालिकेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच मुंबईकरांना भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास दुर करण्यासठी पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये डॉग व्हॅनची गस्त वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एका कुत्र्याच्यामागे ६८० रुपये खर्च केला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने (Corporation ) सांगितले आहे. यामुळे मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात राहिल.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या श्वान विभागामार्फत श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरण करुन पुन्हा त्या श्वानांना मुळे परिसरात सोडण्यात येणार आहे. माहितीनुसार २०१४ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली होती यावेळी मुंबईतील ९५ हजार १७४ भटक्या श्वानांपैकी २५ हजार ९३५ श्वानांचे निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरण करण्यात आले नव्हते. श्वानांच्या संख्येत १४६७४ नर तर ११२६१ मादी श्वानांचा समावेश होता. एक मादी चार श्वानांना जन्म देते ती पिल्ले एका वर्षात प्रजननक्षम होतात. यामुळेच श्वानांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशानुसार वर्षाला ३० टक्के श्वानांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पालिका उपाययोजना करत आहे. नव्या ७ श्वान वाहनांबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी मांडला आहे.