मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी महानगरपालिकेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना : वाचा सविस्तर

आरोग्य कर्मचारी, फ्रटलाईन कर्मचारी आणि ४५ व त्यावरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस राखीव असेल. त्यानंतर कोव्हाॅसिन लस साठी सर्व वयोगटातील लसीच्या दुसऱ्या डोस साठी राखीव असतील. २७ मे ते २९ मे ऑनलाईन बुकींग करण्याऱ्या नागरिकांसाठी लस राखीव ठेवण्यात आली आहे.

    मुंबई : रविवारी २३ मे रोजी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र बंद होती. पण आजपासून मुंबईत लसीकरणला वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

    दरम्यान २४ मे ते २६ मे या ३ दिवसात लसीकरण केंद्रांवर थेट येण्याचे (वाॅक इन) मुभा असणार आहे. २४ मे ते २६ मे असे ३ दिवस कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोससाठी ६० वर्ष व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ६० वर्ष व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी दुसऱ्या डोस साठी लस राखीव ठेवण्यात येईल.

    तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रटलाईन कर्मचारी आणि ४५ व त्यावरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस राखीव असेल. त्यानंतर कोव्हाॅसिन लस साठी सर्व वयोगटातील लसीच्या दुसऱ्या डोस साठी राखीव असतील. २७ मे ते २९ मे ऑनलाईन बुकींग करण्याऱ्या नागरिकांसाठी लस राखीव ठेवण्यात आली आहे. ३० मे रोजी लसीकरण बंद असेल. लसीच्या दोन डोस मधील अंतर आता १२ ते १६ आठवड्याचे असणार आहे. अशा महानगरपालिकेने सूचना केल्या आहेत.