महापालिकेचा लाचखोर अभियंता गजाआड – एसीबीने रचला सापळा

महापालिकेचा दुय्यम अभियंता आणि एकाला गोदाम बांधण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी २७ लाखांच्या लाचेची मागणी करून ५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.

    मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) महापालिकेचा दुय्यम अभियंता आणि एकाला गोदाम बांधण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी २७ लाखांच्या लाचेची मागणी करून ५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. संदीप गीते आणि मुझफ्फर बाबू अली सय्यद उर्फ बबलू अशी त्या दोघांची नावे आहेत. तक्रारदारांचा ससून डॉक येथे मासेमारीचा व्यवसाय आहे. त्यांनी ससून डॉक येथे बीपीटीच्या पडीक जागेवर बोटीचे सामान आणि खलाशांना राहण्यासाठी गोडाऊन बांधण्यासाठी पालिकेच्या ए वॉर्डमध्ये अर्ज केला होता. त्या जागेवर बांधकाम करण्यासाठीच बबलू नावाच्या कंत्राटदाराला बांधकामाचे काम दिले होते. बबलूची पालिका अधिकाऱ्यांशी ओळख असल्याने तक्रारदारांनी संदीप याची भेट घेतली. तेव्हा बांधकामाच्या परवानगीसाठी २७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली. तडजोडीअंती २५ लाखांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता ५ लाख रुपये म्हणून बबलूकडे देण्यास सांगितले. एसीबीने सापळा रचून लाच घेताना बबलूला आणि बबलूकडून लाच घेताना गीतेंना अटक केली.