Cases of atrocities and domestic violence; MNS Navi Mumbai city president Gajajan Kale's pre-arrest bail today

आज म्हणजे बुधवारी गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. जस्टिस एस. के. शिंदे यांच्यासमोर गजानन काळे यांची सुनावणी झाली. शिंदे यांनी दोन्ही बाजू ऐकून काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याअगोदर कोर्टाने ७ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. आता अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने गजानन काळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    मुंबई : नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार होते. मात्र मुंबई कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. त्यामुळं गजानन काळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    आज म्हणजे बुधवारी गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. जस्टिस एस. के. शिंदे यांच्यासमोर गजानन काळे यांची सुनावणी झाली. शिंदे यांनी दोन्ही बाजू ऐकून काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याअगोदर कोर्टाने ७ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. आता अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने गजानन काळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    मानसिक आणि शारिरीक छळवणूक, विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा आरोपांनंतर नेरुळ पोलिस स्थानकात काळेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. यानंतर खळबळ माजली होती. परंतु पक्षांकडून काळेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

    २००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.