परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आक्षेप कशासाठी? न्यायालयाची याचिकाकर्त्यांवर प्रश्नाची सरबत्ती, याचिका अखेर मागे

राज्य सरकारने जर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला काय आक्षेप आहे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना विचारला. मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नावरून कोर्टानं अक्षरशः कुलकर्णींना धारेवर धरलं. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणारी ही याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली. त्यामुळे दहावीची परीक्षा होण्याबाबत उरलासुरला संभ्रमही आता दूर झाला आहे. 

    राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणारे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांच्यावर कोर्टाने अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली. राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचं सांगत धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

    राज्य सरकारने जर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला काय आक्षेप आहे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना विचारला. मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नावरून कोर्टानं अक्षरशः कुलकर्णींना धारेवर धरलं. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणारी ही याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली. त्यामुळे दहावीची परीक्षा होण्याबाबत उरलासुरला संभ्रमही आता दूर झाला आहे.

    महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला जर राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्हाव्यात असं वाटत असेल, तर राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घेणार का, असा सवाल उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला. मुळात धनंजय कुलकर्णी कोण आहेत, त्यांचे शिक्षण क्षेत्रात काय योगदान आहे, असे सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केले.

    अकरावीचे प्रवेश कुठल्या निकषावर होणार, याबाबतही कोर्टानं भाष्य केलंय. अकरावी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार असल्यामुळे सर्वांना समान संधी मिळणार असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळं विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नसून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नसल्याचं कोर्टानं म्हटलंय.