विद्यापिठाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार

परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान एक महिना मिळावा म्हणून त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. यामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी या दोघांनी जून २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेले परिपत्रक सादर केले.

मुंबई : मुंबई विद्यापिठाच्या (university ) अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढील महिन्यात सुरु होत आहेत. यामध्ये उच्च न्यायालयाने (Court ) परीक्षांच्या वेळापत्रकात (examination schedule) हस्तक्षेप करण्याचा नकार दिला आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकादार विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुरुंना परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात निवेदन करण्याची परवानगी दिली. सचिन मांडवकर (४३) बीएच्या अंतिम वर्षाला आहेत. तर दिलीप रणदिवे (५३) यांनी एलएलबीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला आहे.

परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान एक महिना मिळावा म्हणून त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. यामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी या दोघांनी जून २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेले परिपत्रक सादर केले. महाविद्यालयांनी किमान एक महिना आधी परीक्षांचे वेळापत्रक सादर करावे. असे या परिपत्रकात नमूद केले आहे.


मुंबई विद्यापीठातर्फे रुई रोड्रिग्स यांनी न्यायालयाला सांगितले की, हे परिपत्रक लागू होत नाही. कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या मुलांच्या ऑनलाईन परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरु होतील. तसेच बॅकलॉग परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार करुन पुरेसा वेळही दिला आहे. तसेच परीक्षांचे स्वरुपचही बदलले आहे. असे याचिकादारांचे वकील शेरॉन पाटोळे यांनी न्यायालयाला सांगितले आहे.