वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आक्षेप घेऊ शकते? न्यायालयानं दिला असा निकाल

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका केसमध्ये मुलीने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप घेत ते अवैध ठरवण्याची मागणी केली होती. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर सावत्र आईने सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेत आपली फसवणूक केल्याचा दावा या मुलीने केलाय. शिवाय आपल्या आईचं निधन झाल्यानंतर तिने वडिलांशी दुसरं लग्न करताना आधीच्या पतीला घटस्फोट दिला नसल्याची बाबदेखील तिनं कोर्टात सांगितली. 

    आपल्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्याचे काही परिणाम भोगावे लागले, तर अशा प्रसंगात मुलगी वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप घेऊ शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. त्यामुळे लग्न करणं ही वैयक्तिक बाब असली तरी संपत्तीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून मुलीला आक्षेप घेण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट झालंय.

    मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका केसमध्ये मुलीने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप घेत ते अवैध ठरवण्याची मागणी केली होती. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर सावत्र आईने सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेत आपली फसवणूक केल्याचा दावा या मुलीने केलाय. शिवाय आपल्या आईचं निधन झाल्यानंतर तिने वडिलांशी दुसरं लग्न करताना आधीच्या पतीला घटस्फोट दिला नसल्याची बाबदेखील तिनं कोर्टात सांगितली.

    यावर वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप घेण्याचा अधिकार मुलीला असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. आपल्या वडिलांना मानसिक आजार असून सावत्र आईने त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही या मुलीने केला. शिवाय आपल्या नावे असणारी संपत्तीदेखील हडप करण्याचा प्रयत्न आपली सावत्र आई करत असल्याची तक्रार केलीय.

    तर मुलगीच आपली संपत्ती हडपू पाहात असल्याचा आऱोप तिच्या सावत्र आईनं केलाय. १९८४ सालीच आपण आपल्या पहिल्या पतीलाम घटस्फोट दिला असून मुंबईतील मॅरेज रजिस्ट्रारने सर्व कागदपत्रं तपासूनच आपलं लग्न रजिस्टर केल्याचं या महिलेनं म्हटलंय. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कुटुंब न्यायालयाने वेगळा निकाल दिला होता. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप घेण्याचा अधिकार मुलीला नसल्याचं कुटुंब न्यायालयानं म्हटलं होतं. तर मुंबई उच्च न्यायालयाने मात्र मुलीला तसा अधिकार असल्याचा निर्णय दिलाय.