Court's decision is a slap in the face to the government, still 'ego' aside, do another car shed, advises Devendra Fadnavis

महाविकास आघाडीचा नागरिकांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरेच्या जागेत कारशेड बनवणे योग्य आहे. सरकारला अताही तेथे कारशेड नेता येईल. यावर महाविकास आघाडीने फेरविचार करावा. मेट्रो कारशेडबाबत घेतलेला निर्णय सरकारसाठी चपराक असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या (Kanjur Metro Car Shed) कामावर उच्च न्यायालयाने (High Court) स्थगिती आणल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन आरोपाच्या फैरी जडल्या आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हल्लाबोल केला आहे. कालच यासंदर्भात सभागृहात परिस्थिती स्पष्ट केली होती. अतिशय चुकीची ऑर्डर होती. केवळ इगोकरता हा हस्नितांतरण निर्णय घेण्यात आला होता. असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, याबाबत कालच सभागृहात परिस्थिती स्पष्ट केली होती. कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड नेणे ही अतिशय चुकीची ऑर्डर होती. महाविकास आघाडी सरकारने फक्त इगोकरता हा हस्तांतरणाचा निर्णय घेतला होता. कांजूरमार्गमधील जागा जरी मोकळी असली तरी त्या जागेवर कारशेड बनवणे चुकीचे आहे, कारण या कामास पूर्ण होण्यासाठी आता ४ वर्ष लागणार आहे तसेच याचा खर्चही जास्त होणार आहे. आरेमध्ये कारशेड बनवणे हे पर्यावरणदृष्ट्या योग्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीचा नागरिकांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरेच्या जागेत कारशेड बनवणे योग्य आहे. सरकारला अताही तेथे कारशेड नेता येईल. यावर महाविकास आघाडीने फेरविचार करावा. मेट्रो कारशेडबाबत घेतलेला निर्णय सरकारसाठी चपराक असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इगोचा प्रश्न केला. आणि याचाच फायदा घेत काही अधिकाऱ्यांनी त्यांना चुकीचे मार्गदर्शन केले असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. आरेतील कारशेडमध्ये काम करावेच लागणार आहे, त्यामुळे आजही तिथे हा प्रकल्प न्यावा. हा विजय, पराभवाचा प्रश्न नाही. असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.