कोविड १९ : राज्यात रक्तसाठा मुबलक ; भविष्यात गरज पडल्यास आरोग्यमंत्री रक्तदानासाठी जनतेला आवाहन करणार

येत्या काही दिवसात काेविडमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास आराेग्य मंत्री राजेश टाेपे रक्तदानासाठी आवाहन करतील असेही बाेलले जात आहे. याशिवाय रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्याकरीता उपाययाेजना करण्याबाबतचे आदेश राज्यातील सर्व खासगी रक्तपेढ्यांना देण्यात आले आहे.

  • सध्या ३५ हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध
  • राज्यसह मुंबईतील सर्व छाेट्या रक्तपेढ्या स्थ‌ानिक परिसरात रक्तदानासाठी आवाहन करणार

मुंबई: मागील काही दिवसांपांसून मुंबईसह राज्यात काेविड रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काेविड काळात कमी रक्त संकलन हाेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत, त्यातच उन्हाळा आला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत, अजूनही वर्कफाॅर्म हाेम सुरु आहे, ज्यामुळे रक्ताचा तुटवडा भविष्यात हाेवू शकताे पण सध्या राज्यात ३५ हजार यूनिट रक्तसाठा उपलब्ध आहे. तुर्तास तरीही राज्यात रक्तसाठा मुबलक असल्याचे संकेत आराेग्य विभागाकाडून देण्यात आले आहे.

येत्या काही दिवसात काेविडमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास आराेग्य मंत्री राजेश टाेपे रक्तदानासाठी आवाहन करतील असेही बाेलले जात आहे. याशिवाय रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्याकरीता उपाययाेजना करण्याबाबतचे आदेश राज्यातील सर्व खासगी रक्तपेढ्यांना देण्यात आले आहे.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताे. त्यात आता काेविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महािवद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्राेत आहे परंतु काेविड-१९ महािवद्यालये बंद आहेत. तर बऱ्याच मेाठ्या कंपन्या काॅर्पाेरेट हाऊन, वशिेषत: माहिती तंत्रज्ञानातील कंपन्या रक्तदानासाठी अग्रेसर असतात त्यापैकी बऱ्याच कंपन्यांनी वर्क फाॅर्म हाेम सुरु केल्याने मागील काही महिन्यांपासून रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत. तर सध्या वाढत्या काेविड रुग्णसंख्येमुळे दुसऱ्या लाटेची भिती निर्माण झालेली आहे.

याच पार्श्वभूमीवर, येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाल्यास व रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्याकरीता सर्व रक्तकेंद्रांनी अलर्ट राहावे तसेच रक्तपेढ्यांनी स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयाेजन करावेत असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे काय आहेत आदेश?

रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्याकरीता सर्व रक्तपेढ्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांना संपर्क करुन सामजिक अंतर व इतर नियमांचे पालन करुन लहान लहान प्रमाणात आपापल्या परिसरात स्वैिच्छक रक्तदान शिबीरे आयाेजित करावेत, यात गृहनिर्माण माेठया साेसायटी, छाेट्या-छाेट्या साेसायटी वजा बैठ्या चाळी यांचा समावेश आहे. याशिवाय येथे रक्तसंकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर देण्यात यावा, तर राज्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी सर्व रक्तपेढ्यांनी घ्यावी असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.

सध्या ३५ हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध

सध्या ३५ हजार युिनट रक्तसाठा असून तुर्तास तरीही हा साठा मुबलक आहे. काेविड रुग्णसंख्याही वाढत आहे व संभाव्य रक्त तुटवडा जाणवल्यास राज्यातील सर्व खासगी रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरे घेण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत व रक्ततुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. काेविड रुग्ण दिवसें दिवसेंदिवस वाढत आहेत, काेविड लसीकरण सुरु झाले आहे ही दिलासादायक बाब आहे. यामुळे काेविड राेखण्यासाठी नक्कीच मदत हाेईल.

– डाॅ. अरुण थाेरात (सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद)