मुंबईत कोरोनाचे निर्बंध होणार आणखी जाचक; आता ५ रुग्ण आढळल्यास महापालिका संपूर्ण इमारतच करणार सील

मुंबईतही रविवारपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याची घोषणा केली आहे आणि या दरम्यानच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या की, २८ मार्च (रविवार) रात्री १० किंवा ११ वाजल्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येऊ शकते.

    मुंबई : मुंबई (Mumbai) मध्ये सातत्याने उग्र रुप धारण करणाऱ्या कोरोना विषाणू (Corona Virus) चे प्रमाण पाहता महापालिका (BMC) निर्बंध आणखी जाचक करण्याच्या तयारीत आहे. अलीकडच्या काही दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि विशेषत: मुंबईत दिवसाला ५ हजारहून अधिक कोविड-१९ची प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनाचा वाढता कहर पाहता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने अनेक शहरांत लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

    मुंबईतही रविवारपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याची घोषणा केली आहे आणि या दरम्यानच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या की, २८ मार्च (रविवार) रात्री १० किंवा ११ वाजल्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येऊ शकते. सोबतच वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता महापालिका एकाच इमारतीत ४ किंवा ५ रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारतच सील करणार आहे. अशातच केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

    इमारतीत झोपडी आणि झोपडपट्ट्या किंवा चाळींच्या तुलनेत अधिकाधिक रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. शहरात रात्रीच्या संचारबंदी दरम्यान पब आणि हॉटेल्स बंद राहतील आणि आवश्यक गोष्टींचीच दुकाने उघडी राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पेडणेकर यांनी नमूद केले.
    याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, जर लोकांनी नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले नाही आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी झाली नाही तर यापुढे निर्बंध अधिकाधिक जाचक करण्यात येतील.

    महाराष्ट्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मॉल, मार्केट, सिनेमागृहांमध्ये आताच्या घडीला ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. विवाहसोहळ्यात ५० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे ३६ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात साडेपाच हजार कोरोनाचे रुग्ण फक्त मुंबईतील आहेत.