रिलायन्स आणि भारत पेट्रोलियमचे कौतुकास्पद पाऊल, कोविड ॲम्ब्युलन्सला मिळणार मोफत इंधन

भारतातील आरबीएमएलच्या १४२१ इंधन केंद्राच्या नेटवर्कद्वारे शुल्काशिवाय कोविड-१९ रुग्णवाहिकांसह शासकीय व खासगी रुग्णालयातील वाहनांना रिलायन्स आणि भारत पेट्रोलियमकडून मोफत इंधन(Free Fuel) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

    मुंबई: रिलायन्स(Reliance) अणि भारत पेट्रोलियम(Bharat Petroleum) यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या रिलायन्स बीपी मोबिलिटी आपल्या ‘जिओ-बीपी’ ब्रँड अंतर्गत अणि रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने कोविड अत्यावश्यक वाहनांना मोफत इंधन(Free Fuel To Ambulance) उपलब्ध करण्यात येणार आहे.

    मोबाईल इंधन बाऊझरची स्थापना वरळी परिवहन गॅरेज एमसीजीएलएम येथे केली आहे. मे २०२१ मध्ये ७.३० कोटींचे ८११.०७ किलो लिटर इंधन अत्यावश्यक वाहनांना उपलब्ध केले आहे. दररोज ५० ते ६० किलो लिटर मोफत इंधन या उपक्रमाद्वारे ३० जूनपर्यंत चालविणार आहेत.

    भारतातील आरबीएमएलच्या १४२१ इंधन केंद्राच्या नेटवर्कद्वारे शुल्काशिवाय कोविड-१९ रुग्णवाहिकांसह शासकीय व खासगी रुग्णालयातील वाहनांना रिलायन्स आणि भारत पेट्रोलियमकडून मोफत इंधन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.