प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात शुक्रवारी राज्यात ५,२२९ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. पण कोराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेपेक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याचे समाेर आले आहे. आज राज्यात १२७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,४२,५८७ झाली आहे. आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १७,१०,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ८३,८५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • राज्यात आढळले ५,२२९ नवे रुग्ण

मुंबई (Mumbai).  राज्यात शुक्रवारी राज्यात ५,२२९ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. पण कोराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेपेक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याचे समाेर आले आहे. आज राज्यात १२७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,४२,५८७ झाली आहे. आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १७,१०,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ८३,८५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शुक्रवारी १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण १२७ मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू अहमदनगर-१५,पुणे -८, नागपूर-५, सांगली-५, गडचिराेली-३, औरंगाबाद-२, परभणी- २, सातारा-२ आणि यवतमाळ-१ असे आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १.११ लाख पेक्षा जास्त प्रयाेगशाळा नमुन्यांपैकी १८.४२ लाख (१६.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५.४७ लाख व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ५,५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.