प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई शहरातील दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे कोविड दुप्पटीचा दर वाढला असून सध्या 477 दिवसांवर आहे. मागील महिन्यात हाच दर 96 दिवसांवर पोहचला होता. मुंबई पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, 24 प्रभागांपैकी 12 प्रभागांचा दुप्पटीचा दर 500 दिवसांपेक्षा जास्त आहे. पालिका अधिकारी आणि डॉक्टरांनी मुंबईत राबवलेल्या कठोर उपाययोजना आणि वेळेच्या निर्बंधास याचे श्रेय देत केसेस नियंत्रणत येत असल्याची दिलासादायक बाब सांगण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबई शहरातील दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे कोविड दुप्पटीचा दर वाढला असून सध्या 477 दिवसांवर आहे. मागील महिन्यात हाच दर 96 दिवसांवर पोहचला होता. मुंबई पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, 24 प्रभागांपैकी 12 प्रभागांचा दुप्पटीचा दर 500 दिवसांपेक्षा जास्त आहे. पालिका अधिकारी आणि डॉक्टरांनी मुंबईत राबवलेल्या कठोर उपाययोजना आणि वेळेच्या निर्बंधास याचे श्रेय देत केसेस नियंत्रणत येत असल्याची दिलासादायक बाब सांगण्यात आली आहे.

    दरम्यान, रुग्ण बरे होण्याचा कालावधी 0.14 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात मुंबई शहराचा दुप्पट दर 477 दिवसांवर होता जो आता 96 दिवसांवर पोहोचला आहे. याचा अर्थ गेल्या महिन्याभरात दुप्पटीने वाढला आहे.

    सी वॉर्ड मध्ये रुग्ण दुप्पटीचा दर 975 दिवसांवर आहे, त्यानंतर एफ साऊथ-वार्ड (831 दिवस), बी-वार्ड (713 दिवस) एन वॉर्ड (694 दिवस), इ (624 दिवस), एम पूर्व -वॉर्ड (623 दिवस), एम वेस्ट (606 दिवस) आणि टी वॉर्ड (590 दिवस). दरम्यान, आर-उत्तर वॉर्डमध्ये सर्वात कमी दुप्पट दर 321 दिवस आहे.

    अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, दुप्पटीचा दर वाढण्यामागे बरीचशी कारणे आहेत. गेल्या महिन्याभरात केसेस मध्ये घट झाल्याने दुपटीचा दर 477 दिवसांवर गेला आहे. शिवाय, दुसर्‍या लाटेनंतर लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे चांगला परिणाम दिसून येत आहे.

    “ दुप्पटीचा दर वाढणे हे शहरासाठी चांगले लक्षण आहे कारण बहुतेक प्रभागांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे. कारण, काही प्रभाग वगळता सर्व प्रभागांचा दुप्पट दर 500 दिवसांपेक्षा जास्त आहे. असे काकाणी यांनी सांगितले.