कोविड रुग्णालय करण्याला विरोध; नायर रुग्णालयातील डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार?

मुंबई महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथे नायर रुग्णालय आहे. पालिकेच्या मोठया रुग्णालयापैकी सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नायर रुग्णालयाची ओळख आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्याने रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास निवासी डॉक्टरांनी विरोध केला आहे.

    मुंबई : मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नायर रुग्णालयातील सर्व खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मार्डने तीव्र विरोध केला असून या विरोधात मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

    मुंबई महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथे नायर रुग्णालय आहे. पालिकेच्या मोठया रुग्णालयापैकी सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नायर रुग्णालयाची ओळख आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्याने रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास निवासी डॉक्टरांनी विरोध केला आहे.

    रुग्णालयातील काही खाटा कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, शिकाऊ डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सक्ती करू नये अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. मागण्या मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.