क्रिकेट सट्टेबाजाचा परमबीरसिंग यांच्यावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; परमबीरांचा पाय खोलात

मुंबईचे माजी पोलिस आुयक्त परमबीरसिंग यांना दोन दिवसांपूर्वीच कोर्टाने दिलासा दिला असला तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने परमबीर सिंग यांनी अटक टाळायची असेल तर माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मांना 10 कोटी रुपये देण्यास सांगितले असल्याचा कबुलीजबाबच सीआयडीला दिला आहे. जालानने परमबीर, शर्मा आणि पोलिस निरीक्षक राजकुमार यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आुयक्त परमबीरसिंग यांना दोन दिवसांपूर्वीच कोर्टाने दिलासा दिला असला तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने परमबीर सिंग यांनी अटक टाळायची असेल तर माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मांना 10 कोटी रुपये देण्यास सांगितले असल्याचा कबुलीजबाबच सीआयडीला दिला आहे. जालानने परमबीर, शर्मा आणि पोलिस निरीक्षक राजकुमार यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे.

    सिंग यांनी भारतात सक्रीय क्रिकेट सट्टेबाजांची नावेही विचारली आणि ती न दिल्यास कुटुंबातील सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकीही दिली होती, असेही जबाबात सोनूने नमूद केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता परमबीर यांची जुनी प्रकरणे बाहेर येत असून त्यांचा पाय खोलात असल्याचे दिसत आहे.

    आरोपांसंबंधी सोनूने महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर सीआयडीने तपास सुरू केला. सट्टेबाजी प्रकरणात मे 2018 मध्ये अटक झाल्यानंतर त्याला परमबीर यांच्यापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी ते ठाणे पोलिस आयुक्त होते. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने सोनूला अटक केली होती.