मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, क्राईम ब्रँचने केला पर्दाफाश, २७२ इंजेक्शन केले जप्त

कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन वापरलं जातं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. त्यामुळे त्याचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालंय. मुंबईच्या गुन्हे शाखेनं मुंबईतून २७२ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केलेत. 

    देशात एकीकडे कोरोना उद्रेक होत असताना आणि कोरोना रुग्णांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना कोरोनावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव उजेडात आलंय. त्यामुळे सरकारी यंत्रणांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसलाय.

    कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन वापरलं जातं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. त्यामुळे त्याचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालंय. मुंबईच्या गुन्हे शाखेनं मुंबईतून २७२ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केलेत.

    मुंबईच्या अंधेरीतील एका दुकानात हे इंजेक्शन ठेवण्यात आले होते. मुंबईत इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार चौकशी करत मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने तपास केला. या काळ्या बाजाराची पाळंमुळं अंधेरीपर्यंत जाऊन पोहोचत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन अंधेरीतील त्या दुकानाचा शोध लावला आणि त्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात एकाच वेळी २७२ रेमडेसिवीर इंजेक्शन्स लपवून ठेवल्याचं लक्षात आलं.

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनचा उपयोग करण्यात येतो. याची मागणी वाढल्यामुळे लवकरच याचा तुटवडा निर्माण होईल आणि चढ्या दराने इंजेक्शन विकता येईल, या हेतून ही इंजेक्शन लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. इतरही अनेक ठिकाणी अशा प्रकारे इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.