मुंबईकारांवर पाणी कपातीचे  संकट; तलावामध्ये जलसाठा केवळ १८ टक्केच

मागील काही वर्षांमध्ये पावसाचा कल बदलेला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा होता.

    मुंबई: यंदा मान्सून सुरु झाल्यानंतर काही दिवसातच पावसाने दडी मारली. जून महिन्यात तुरळक ठिकाणीच पाऊस पडला. मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये केवळ १८ टक्केच जलसाठा उरलेला असल्याचे समोर आले आहे. परिणामी मुंबईवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.
    मागील काही वर्षांमध्ये पावसाचा कल बदलेला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा होता. मात्र, त्यानंतर मुसळधार पावसाने तलाव भरून वाहत होते. दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांत १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. सध्या सात तलावांत मिळून दोन लाख ६३ हजार ६३१ दशलक्ष लिटर जलसाठा जमा आहे.